INSTITUTES
Sharada Balak Vihar
( Pre - Primary )
Sharada Vidya Mandir
( Primary )
Laxmanrao Apte Prashala
( High School )
Laxmanrao Apte
( Junior College )
VM’s Vocational Training and Research Centre for deaf and Dumb students
Laxmanrao Apte
(Night School)
MS - CIT

Inaugral Function :

विद्यार्थ्यांची फ्रेशर्स पार्टी... अशीही!

Please click on to watch Utube Videos


पुणे - अत्तराचा पसरलेला सुगंध... गुलाबपुष्प देऊन करण्यात येणारे स्वागत... तुषाररूपात होणारा गुलाबपाण्याचा शिडकावा... एका बाजूला खडकवासला धरणाचा विस्तीर्ण जलाशय, तर समोर शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा एक मानबिंदू सिंहगड किल्ला... अशा वातावरणात "फ्रेशर्स' विद्यार्थ्यांची पार्टी शिक्षक व पालकांच्या उपस्थितीत झाली. वर्षभराच्या अभ्यासाच्या स्वरूपाबरोबरच पुढे कोणत्या क्षेत्रात कारकीर्द करता येईल, याची माहिती या वेळी शिक्षकांनी विद्यार्थी व पालकांनी दिली.

Mr.Vasantrao Apte (Trustee)
Inaugural - (From left) - Mr.Vasantrao Apte(Trustee), Dr.Vijay Neurgaonkar (Trustee), Advocate. Abhay Apte (Chairman), Mrs.Aparna Kulkarni ( Secretory ), Mr.D.G.Benare(Vice- Presidents), Mr.Mete(Joint Secretory).

अंधार नाही, गोंधळ नाही की गोंगाट नाही! विद्यार्थी व पालक खरोखरच "फ्रेश' होतील असे वातावरण. "विद्येचे माहेरघर' या पुण्याच्या लौकिकात भर घालण्याबरोबरच सर्वांना आदर्श ठरेल, असे स्वरूप या कार्यक्रमाला आले होते. निमित्त होते विद्या महामंडळ संचालित लक्ष्मणराव आपटे कनिष्ठ महाविद्यालयाच्या अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या अनोख्या स्वागत समारंभाचे. गुरुवारी सकाळी खडकवासल्याच्या परिसरातील शांतिवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संस्थेचे विश्‍वस्त वसंत आपटे, डॉ. विजय नेऊरगावकर, कार्याध्यक्ष ऍड. अभय आपटे, सचिव अपर्णा कुलकर्णी, अभिजित आपटे व इतर सदस्य; तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी पालकांसह उपस्थित होते.

Advocate. Abhay Apte (Chairman) Mrs.Aparna Kulkarni ( Secretory )

सुमारे वीस वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाला उपस्थित राहणे सर्व विद्यार्थी व पालकांना बंधनकारक असते. पूर्वी वृक्षारोपण, श्रमदान, पालकांसह छोटासा ट्रेक आदी उपक्रमही राबविले जात. आता करिअर व व्यक्तिमत्त्व विकास याबाबत मार्गदर्शन करण्यावर भर देण्यात येतो. नंतरचा संपूर्ण आठवडा "आनंद सप्ताह' म्हणून साजरा केला जातो. यामध्ये व्यक्तिमत्त्व विकास शिबिर, संस्था भेटी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी उपक्रमांचा समावेश असतो. 
या कार्यक्रमाच्या सुरवातीला अपर्णा कुलकर्णी यांनी उपस्थितांना संस्थेची ओळख करून दिली. या वेळी अभय आपटे म्हणाले, ""पालकांनी पाल्यांचा "रिमोट कंट्रोल' होऊ नये. आपले विचार त्यांच्यावर लादू नयेत. याउलट पाल्याचा "इन्व्हर्टर' बनून, त्यांच्या समोर अंधारी आल्यास त्यांना "पॉवर' देण्याचे काम करावे. परीक्षेतले गुण म्हणजेच सर्व काही नाही. खरे शिक्षण वेगळेच असते.''


Parents at play Student's participation in various activities


विद्यार्थ्यांचे स्वागत झाल्यावर सर्व विद्यार्थ्यांना आनंदी राहण्याची शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांना दुसऱ्या एका विद्यार्थ्याच्या नावाची चिठ्ठी देऊन, जेवणाच्या सुट्टीत त्या विद्यार्थ्याला शोधून काढायचे व त्याची ओळख सर्वांना करून द्यायची होती, ही जबाबदारी देण्यात आली होती. पालकांचे गट पाडून त्यांच्यात स्पर्धा घेण्यात आली. एका ओळीत उभे राहून हाताच्या ओंजळीतून पाणी पास करण्याच्या या स्पर्धेत इलेक्‍ट्रॉनिक विभागाच्या पालकांनी बाजी मारली. टुरिझम विभागाच्या विद्यार्थ्यांनी फ्रेंच भाषेतील गीत सादर केले, तर इलेक्‍ट्रिकलच्या विद्यार्थ्यांनी जर्मन भाषेतील नाटक सादर केले. महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी विद्यार्थ्यांवरच सोपविण्यात आली होती. याबाबत मानसी गर्दे या विद्यार्थिनीने, ""महाविद्यालयाच्या पहिल्याच दिवशी सर्व शिक्षकांशी, नव्या मित्रमैत्रिणींशी अनौपचारिक ओळख झाली. त्यामुळे "ऑकवर्ड' वाटत नाही. या वातावरणात आम्हाला नवा उत्साह मिळाला आहे,'' अशी भावना व्यक्त केली. मानसीची आई शुभांगी म्हणाल्या, ""पालकांनाही यात सहभागी करून घेतल्याने मनातली संदिग्धता दूर झाली आणि मुलांना योग्य मार्गदर्शन मिळेल, याची खात्रीही झाली.''

वीस वर्षांपासून सुरू उपक्रम...
अकरावीच्या शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांचा पहिला दिवस महाविद्यालयाबाहेर निसर्गाच्या सान्निध्यात साजरा करावा, ही कल्पना संस्थेचे संस्थापक व पहिले प्राचार्य पु. ग. वैद्य यांची. सामाजिक बांधिलकीचे धडे वर्गात बसून शिकवता येत नाहीत, असे त्यांचे ठाम मत होते. त्यानुसार तब्बल वीस वर्षांपासून अशा प्रकारे अकरावीचा पहिला दिवस निसर्गाच्या सान्निध्यात साजरा होतो.
  Contact :

  
Laxman Rao Apte Junior College
  1244,Apte Road,Deccan Gymkhana,
  Pune 411004.

  Phone : + 91- 020 - 25531996

  E-mail : info@vidyamaha.edu.in
  Make an Enquiry